शिमगा हा खास कोकणी माणसाचा आवडता सण संपूर्ण कोकणात हा सण उत्साहात साजरे केले जाते कोकणातील प्रत्येक खेडेगावातील ग्रामदेवतेच्या पालखी उत्सव कोकणातील खेडो पाड्या तून साजरी केली जाते आपल्या ग्राम देवतेच्या च्या पालखी उत्सवासाठी मुंबईतील चाकरमानीअगदी हमखास आपल्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट पहात असतो आपल्या ग्रामदैवतचे दर्शनासाठी व साकडे घालण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी मुंबईकर चाकरमानी असो किंवा इतर शहरात राहणारा चाकरमानी शिमगा उत्सव ची वाट पहात असतो खेडे गावातील लोक आपल्या ग्राम देवतेच्या पालखी,शिमगा उत्सव साजरा करण्या साठी महिना पूर्वीच साजरी करण्याची तयारीला लागतात.
मराठी महिन्याच्या अखेरचा महिना आणि हिंदू वर्षा साठी अखेरचा महिना म्हणजे फाल्गुन मास फाल्गुन महिन्याची वाट आम्ही सर्व आतुरतेने पहात असतो संपूर्ण वर्ष भरतील मरगळ याच महिन्यात निघून जाते सर्वत्र उजाड माळ व माळरानावर आपली दादागिरी दाखवणारी आंबे फणसाची आणि आईन किंजळाची झाडे शिमग्याची सणाची वाट पहात असतात कारण पौष महिन्याच्या पौर्णिमेला पुन्हा एक महिन्याची चाकरी करून पुन्हा आपापल्या स्थानाला येतात या. मोसमात काजूचा बहर आलेला असतो आणि सगळीकडे पिवळ्या लाल काजूचे बोंड काजूच्या झाडावर स्थानापन्न होऊन जणू काही आपणच या सृष्टीचे मालक आहोत याची जाण करून देतात आंबे,फणस या झाडांना ही मोहर येऊन कैऱ्या तयार होतात. त्याचबरोबर थंडीचा मौसम कमी होऊन गरमी सुरू होते आणि सर्व झाडा वरची पाने जसे आपण फाटक वस्त्र काढून टाकून दिवाळीला नवीन वस्त्र घेतो त्याचप्रमाणे झाडे सुद्धा आपल्या अंगावरती जुनी पाने काढून टाकून नवीन पालवीच्या प्रतीक्षा असतात त्याचप्रमाणे ही सर्व झाडे झुडपे आपल्या नवीन पालवीची वाट पाहत बसलेली असतात आता आपल्याला प्रश्न पडेल की या उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते अशावेळी नवीन पालवी कशी फुटेल तुकाराम महाराज आपले अभंग मध्ये सुंदर वर्णन करतात! फुटती तरुवर उष्ण काळा माथी जिवन तयांना! कोण झाली जो या सृष्टीचा निर्माता आहे तो पालन पोषण करण्याची सुद्धा सर्व जबाबदारी आपल्याकडे स्वतःकडे ठेवतो आणि तुम्ही आम्ही सर्वजण फक्त निमित्तचे कारण आहोत अशी सृष्टीची निर्मिती आणि गती आहे याचप्रमाणे शिमग्या महिन्याचे प्रारंभ म्हणजे संपूर्ण वर्षभरात आलेली मरगळ या महिन्यांमध्ये झटकून आपण येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याची असते या महिन्यात तुम्ही कुठेही रानावनात जा तुम्हाला राना मध्ये कुठे भीती वाटणार नाही शिमग्याची सणामध्ये म्हणजे फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमी ला होळीची सुरुवात मोठ्या थाटामाटाने प्रत्येक गावामध्ये होते तिसऱ्या होळी पासून ते आठव्या होळी पर्यंत कोकणातील काही खेडे गावांतील ग्रामदेवतेच्या पालखीला सजवून ढोल ताशा,सनई घंटा नाद करत वाजत गाजत मिरवणूक साठी नेली जाते मिरवणूक बरोबर जाणाऱ्या लोकांना खेळी म्हंटले जाते.
ग्रामदेवतेचे त्या खेडे गावांतून आगमन झाले की सुवासिनी पालखी ची मनोभावे पूजा करून खणा नारळ ने ओटी भरतात आठव्या नवव्या काही गावांत पंचक्रोशितले खेळी आपले वेग वेगळ्या प्रकारचे खेळ घेऊन इतर गावांत जातात त्यांचे ही श्रध्देने भावाने पूजा करतात
मिरवणूक साठी गेलेल्या पालख्या आठव्या होळीच्या दिवशी आपल्या मूळ गावात आपल्या गावच्या वेशी जवळ येतात पालखीच्या स्वागतासाठी गावातील सर्व ग्रामस्थ,महिला आनंदाने आपल्या ग्रामदेवते स्वागत करतात ढोल, ताशा सनई, नाच गाणे लेझिम खेळत आपल्या गावात आणली जाते त्या दिवशी गावातील रस्त्यावर रांगोळी काढली जाते दोन दिवस गावांत आनंदाचे वातावरण असतो दोन दिवस आपल्या ग्राम देवतेची पालखी घराघरांतून नेली जाते प्रत्येक स्त्री खणा नारळ ने ओटी भरते पालखी सोबत असलेला पुजारी ग्रामदेवतेला त्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी साकडे घालतो दोन दिवस गावात शिमगा उत्सव आनंदाने साजरा केल्यावर होळीच्या दिवशी रात्री पालखीला सानेवर नेली जाते होळीच्या दिवशी होळी भोवती सजावट केली जाते गावचा प्रमुख होळीची पुजा करून होळीला पुरणाची पोळी देतो गावची इडा पिडा ज ळून नवा प्रकाश देण्याबद्दल ग्रामस्थ प्रार्थंना करतात धुलीवंदन चे दिवशी सानेवर सर्व ग्रामस्थ चाकरमानी एकत्रित धुळवट साजरा करतात व पालखीला आनंदाने निरोप देऊन पुन्हा देवळात नेली जाते
सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहत असते काही गावांत ग्राम देवतेच्या निशाणा घेऊन मिरवणूक काढली जाते तिला ढाल काठी म्हटले जाते (मंडणगड तालुक्याती शेवरे गावात ढाल काठी चा मोठा उत्सव साजरा केला जातो) तर कोकणातील काही गावांत ग्रामदेवतेच्या पालखी धुलवट म्हणजे सानेच्या दिवसा पासून गावात मिरवणुक साठी नेतात ते रंगपंचमी पर्यंत उत्सव साजरा करतात तर काही ग्राम देवतेच्या पालखी उत्सव गुढी पाडव्यापर्यंत साजरे केले जाते प्रत्येक घरा घरांमध्ये पालखीला नेली जाते प्रत्येक घरातील कुटुंब आपल्या ग्रामदेवतेला हात जोडून आपल्यावर आलेले संकट असो किंवा आजार पाजार, दूर कर,नोकरी धंदा सुखाने मिळू दे असे गाऱ्हाणे घालतात अशा प्रकारे गुढी पाडव्याला शिमगा सण संपलेला असतो चाकरमानी दुसऱ्या दिवशी डोळ्यात अश्रू घालत मुंबईला येतात व पुढे गौरी गणपतीच्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.
दीपक महाडिक
(मंडणगड)
9323866874