सांगली : बेदाणा स्टोरेज भाड्यावरील जी अस टी रद्द करा, बेदाणा स्टोरेजमध्ये जेवढा दिवस ठेवला जातो तेवढेच भाडे आकारा, तूट 500 ग्रॅम धरा, पेमेंट 21 दिवसातच द्या उशिरा दिल्यास 2 टक्के व्याज आकारणी करा, आदींसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली बाजार समिती समोर शंख ध्वनी आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू,असा इशाराही खराडे यांनी दिला.लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, बेदाण्याचे पेमेंट 21 दिवसात मिळालेच पाहिजे, बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.त्यानंतर बाजार समिती सभापती सुजय शिंदे,सचिव महेश चव्हाण,व्यापारी राजू कुंभार,सुशील हडदरे,प्रशांत मजलेकर,शशिकांत नागे आदीं संघटना प्रतिनिधीची बैठक झाली.या बैठकीत मागील बैठकीत ठरलेल्या बाबीची लगेच अंमलबजावणी करण्याचे ठरले तुट 500 ग्रॅमच धरायची, त्यापेक्षा जास्त तूट धरल्यास बाजार समिती कारवाई करण्याचे ठरले.तसेच 30 दिवसा पेक्षा उशिरा पेमेंट केल्यास जेवढे दिवस उशिरा पेमेंट होईल तेवढ्या दिवसाचे 2 टक्के व्याज आकारणी करण्याचे ठरले.बेदाणा भाड्यावरील जीएसटी आकारणी हा विषय राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने अर्थमंत्री अजित पवारांना सर्वानी भेटण्याचे ठरलें तर स्टोरेज भाड्यासंबधी नियमावली करण्यासाठी येत्या शुक्रवारी स्टोरेज मालक व बाजार समितीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.बेदाणा बॉक्सच्या निम्म्या पैशासाठी खरेदीदार व अडत दुकानदारांची बैठक शुक्रवारीच घेण्याचे निश्चित करण्यात आले.यावेळी संदीप राजोबा,भरत चौगुले,अजित हलीगळे, श्रीधर उदगावे,बाळासाहेब लिंबकाई,वसंत पाटील,हरी कांबळे,ऋषीकेश कणवाडे, बाहुबली सौदते,राहुल पाटील,संजय चौगुले,संजय आवटे,विद्याधर तलले, प्रकाश ओमासे,संजय कदम,चवगोंडा पाटील,राजू दानोले आदींसह शेतकरी उपस्थित होते.