मध्यरात्री झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वर्मी घाव घालून तिघांची हत्या केल्याची भयानक घटना चंद्रपूर जिल्हातील मौशी गावात घडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात तलमले कुंटुब आरोपी अंबादास, दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्यस होते.गेल्या काही महिन्यापासून घरात कौटुंबिक वाद सुरू असल्याने हे हत्याकांड घडल्याचं परिसरात बोललं जात आहे.
शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता. दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या, तेव्हा अंबादास तलमले याने कुऱ्हाडीने तिघांवर सपासप घाव घातले यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.पोलिस याप्रकरणी तपास करत असून आरोपी आंबादासला पोलीसांनी अटक केली आहे.