महावितरण कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात दि.०४ मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी भागवत बोलत होते.यावेळी शकील सुतार,अंकुर कावळे,शशिकांत पाटील,अभिजीत सिकनीस,भूपेंद्र वाघमारे,सुनिल माने, दत्तात्रय भणगे,दिपक पाटील,दिपक भोसले हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व लाईनमनचा सन्मान करण्यात आला. विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्हयात महावितरणात ठिकठिकाणी लाईनमन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पुढे बोलताना श्री.भागवत यांनी विद्युत वाहिनीवर काम करताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सांगताना ‘ सर सलामत तो पगडी पचास’ हा मूलमंत्र दिला. काळानुरूप विद्युत क्षेत्रात सूरू असलेल्या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे ज्ञान जनमित्रांनी प्राप्त करून घ्यावे,असा सल्ला दिला.
जिल्हा विद्युत निरिक्षक मा.शकील सुतार यांनी लाईनमनच्या कामाचे कौतुक करित वर्षभरात वीज कर्मचारी अपघात शून्य झाल्याचे स्पष्ट केले. माञ बाह्य अपघात रोखण्यासाठी काळजी घेतली पाहिजे,असे सांगितले. प्रामुख्याने विद्युत संच मांडणी व्यवस्थित असावी, तारमार्गालगत बांधकाम करताना काळजी घेणे,विद्युत कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा अधिकृत पर्यवेक्षक असावा या सुरक्षेच्या मुलभूत नियमांकडे मा.सुतार यांनी लक्ष वेधले.