कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संपांचा संख परिसराला फटका

0
3
जत : संख(ता.जत) विभागातील कंत्राटी वीज कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने महावितरणच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० टक्के वेतनवाढ करा, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात महावितरण,महापारेषणमधील महानिर्मिती कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे.

 

या संपामध्ये जत तालुका संख उपविभागातील कंत्राटी वीज कामगार संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.राज्यातील अनेक भागात एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे कर्मचारी संपाने वीजपुरवठ्यावर परिणामाचा धोका वाढला आहे.

 

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण,महापारेषणमधील महानिर्मिती,कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यातील महानिर्मिती,महावितरण, महापारेषण  या वीज कंपन्यांत कार्यरत असलेले ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ५ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार सांगली जिल्हा सचिव राजेश माने,संतोष बिराजदार,वाशिम मुल्ला,पाचासाब मुल्ला,अवधूत करले, गजेंद्र चव्हाण,मोहन रजपूत,आप्पासो मोटे, मोहब्बत तिकोंडी,राजेंद्र पाटील,उमेश चव्हाण,अवन्ना पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एकूण-65 संख उपविभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
यावेळी संतोष बिराजदार म्हणाले,  वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० टक्के वेतनवाढ करा,अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यात नुकताच दोन दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. मात्र, ऊर्जा विभागासह वीज कंपन्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली आहे.त्यानुसार हा संप सुरु आहे. शासनाने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here