तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी द्या,अन्यथा आम्हाला ‌कर्नाटकात घ्या | जतच्या आमदारांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

0
अथणीतील उपसा सिंचन ‌योजनेचे उद्घाटन,जतच्या सीमावर्ती गावांना नैसर्गिक उताराने पाणी द्या : आ.विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सावंत यांची मागणी
जत : जत तालुका सीमेलगत १.५ कि.मी.अंतरावर अथणी तालुक्यातील कोट्टलगी या गावी कृष्णा नदीतून ११७६ कोटी.रु.च्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते.सदरच्या योजनेचे काम येत्या १ ते २ वर्षात पूर्ण करून योजना कार्यान्वित करू असे आश्वासन,मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

 

 

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि आ.विक्रमसिंह सावंत यांच्या मागणीनुसार यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या सीमेलगत कार्यन्वित असलेल्या तुबची बबलेश्वर जलसिंचन योजना,मुळवाड जलसिंचन योजना चालू केल्यास सदर योजनेतून नैसर्गिक प्रवाही पद्धतीने कोणताही खर्च न करता महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झालेले असून यापुढेही त्याचा उपयोग होऊ शकतो.या तिन्ही योजनेतून कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या कन्नड भाषिक गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देऊच देऊ आश्वासन दिले.

 

तसेच सिमालगत असलेल्या गडीनाडू कन्नड भाषिक गावांच्या विकासासाठी कर्नाटक शासनाच्या महामंडळातून निधी देऊ असे सांगितले.तसेच कन्नड भाषा शिक्षण झालेल्या सिमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व उद्योगामध्ये आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले.

 

याप्रसंगी अथणी तालुक्यातील करीमसुती उपसा जलसिंचन योजना व आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ११७६ कोटींच्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री आ.लक्षमण सवदी यांनी माझ्या अथणी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असून जत तालुक्यातील जनता माझी बांधव असून या नात्याने मी जत तालुक्यातील सिमावर्ती भागातील जनतेवर कोणताही अन्याय न करता उपलब्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी माजी जलसंपदामंत्री व सध्याचे उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांनी यापूर्वी जत तालुक्यातील दुष्काळ गावांना पाणी देऊन आमचा माणुसकी धर्म आम्ही पाळला आहे.यापुढेसुद्धा जतच्या दुष्काळी भागातील जनतेला आमच्या योजनेतून पाणी देऊ असे सांगितले.
कर्नाटकातील पाणी योजनातून जतच्या सीमावर्ती गावांना नैसर्गिक उताराने पाणी द्यावे,अशी मागणी आ.विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सावंत यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडे केली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.