येळवीत एक वर्षात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कल,तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विरोधी गटाचा उमेदवार विजयी

0
29
येळवीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अनिता जगताप | अटीतटीच्या‌ ग्रामसभेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कल
येळवी : येळवी ता.जत येथील झालेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीच्या सभेत सत्ताधारी गटाच्या लोकनियुक्त सरपंच तथा सभेचे अध्यक्ष सभेतून निघून गेल्यानंतरही गटविकास अधिकारी श्री.सरगर यांच्या आदेशानुसार झालेल्या ग्रामसभेत विरोधी गटाच्या सौ.अनिता जगताप ‌या बहुमताने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विजयी झाल्या.विशेष म्हणजे वर्षभरापुर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ता मिळविलेल्या सत्ताधारी गटाला नागरिकांनी साफ नाकारत विरोधी जगताप गटाला साथ दिल्याने सौ.जगताप यांचा विजय धक्का देणारा ठरला.गतवर्षी झालेल्या निवडणूकीनंतर वर्षभर रेंगलेल्या तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्याची मागणी विरोधी जगताप ‌गटाकडून पहिल्या ग्रामसभेपासून लावून धरण्यात आली होती.सत्ताधारी गटाने याकडे लक्ष न देता एक वर्षाचा कालावधी घालवला.परंतु सत्ताधारी यांना न जुमानता याबाबत विरोधक गटांकडून हा विषय उचलून धरण्यात आला,सतत पाठपुरावा केल्याने सत्ताधार्यांना यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी लागली.त्यानुसार नोटीस जारी करून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी रीतसर अर्ज मागवण्यात आले.यामध्ये सत्ताधारी गटाकडून आनंदा पाटील तर जगताप गटाकडून अनिता जगताप यांचे अर्ज ग्रामपंचायतीस प्राप्त झाले.

 

अतिशय अटीतटीच्या या निवडीमध्ये दोन्ही गटाकडून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.यावेळी दोन्ही गटाकडून टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलीस यंत्रणेला प्रचारण करावे लागले.परंतु मतदानासाठी येळवीतील महिला व पुरूषांनी उस्फुर्तपणे गर्दी केली होती.जमलेली गर्दीचा विरोधी गटाकडे कल दिसताच सत्ताधारी गटाकडून सभा बरखास्त करण्याचा प्रयत्न झाला.त्यानुसार सत्ताधारी गटाकडून विरोधाची भूमिका घेतली जात होती,सरपंचांनी अचानक सभा सोडून जाणे हे त्यासाठीच घडविण्यात आले होते,असा आरोप समाधान जगताप व समर्थकांकडून यावेळी करण्यात आला.ऐनवेळी सभेच्या अध्यक्षांनी म्हणजेच विद्यमान सरपंच यांनी सभेचा कोरम पूर्ण असूनही सभा सोडून गेल्या. त्यामुळे निवडीचा निर्णय देणे सचिव तथा ग्रामसेवक कोळी यांना अवघड झाले होते.ग्रामसेवक कोळी यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सरगर यांना माहिती देत मार्गदर्शन मागविले.यावेळी बीडीओ श्री.सरगर यांनी नियमावर बोट ठेवून अध्यक्षपदाच्या निवडीची नोटीस असल्याने सभा बरखास्त न करता कोरम पूर्ण झाला असून दुसर्‍या अध्यक्षांची निवड करून मतदान घेण्याचा निर्णय दिला.त्यानुसार ग्रामसेवक कोळी यांनी पुढील नियमांचे अभ्यास करून येळवीच्या लोकनियुक्त तंटामुक्त अध्यक्षपदी सौ अनिता जगताप यांची निवड सर्वानुमते झाल्याचे जाहीर केले.

 

यासाठी समाधान जगताप व सहकार्‍यांनी अतिशय अटीतटीच्या व हमरीतुमरीच्या लढाईत विजय खेचून आणला.धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या संघर्षामध्ये अखेर जनशक्तीचा विजय झाला.त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस महाराष्ट्रातील पहील्या महीला लोकनियुक्त तंटामुक्ती अध्यक्षा होण्याचा बहुमान अनिता जगताप यांना मिळाला असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुनील पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे,उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद माने,विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सार्थक कोळी, माजी सरपंच विजयकुमार पोरे, राजकुमार धोत्रे,तुकाराम जगताप,महेश शिंदे,बाबासो वगरे,पिराजी शिंदे.महेश मालगत्ते,शिवाजी आवटे,चंद्रकांत वगरे,बाळासो जमदाडे मेजर,ज्ञानेश्वर माने,बाळासो दुधाळ, भाऊसो कदम,संतोष जमदाडे,नाना भोसले,आदि समर्थक व नागरिक मोठ्यासंख्येनी उपस्थित होते.
जिव्हाळ्याचे संबध जपण्यासाठी येळवीकर धावून आले
जिव्हाळा उद्योग समूह या नावाने आम्ही जगताप कुटुंबीय व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना तालुक्यात नाही तर जिल्हाभरातून आमच्या कार्याचे नावलौकिक मिळाला परंतु ज्या गावातून आम्ही मोठे होत गेलो.त्याच गावातील राजकीय नेत्यांनी जनतेची केलेली व होणारी परवड पाहवली नाही म्हणून अखंड लोकसेवा व येळवीच्या जनतेच्या समस्यांसाठी या राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेतला.येळवीकरांनी माझ्यासाठी जो काही पवित्रा घेऊन सर्वानुमते माझी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल समस्त जनतेची आम्ही ऋणी असून पुढील काळात येळवी व पंचक्रोशीतील जनतेच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही जगताप दांपत्य कटीबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ.अनिता जगताप यांनी ग्वाही दिली.
येळवीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर अनिता जगताप समर्थकांनी जल्लोष केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here