जतच्या दुष्काळ निवरणासाठी श्रीपती शुगरकडून पाण्याच्या टाक्या | महेंद्र लाड : २० टाक्या प्रशासनाकडे सुपुर्द

0
36
जत : जत तालुक्यात यंदा दुष्काळाची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथील टंचाईग्रस्त लोकांना शक्य तितकी अधीकची मदत व दिलासा देण्यासाठी सामजिक बांधिलकी म्हणून श्रीपती शुगर आघाडीवर राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन महेंद्र आप्पा लाड यांनी केले.

 

श्रीपती शुगर डफळापूर यांच्यावतीने जत तालुक्यातील टंचाईयुक्त गावांसाठी दोन हजार लिटरच्या वीस साठवण टाक्या बुधवारी प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी महेंद्र लाड,आमदार विक्रम सावंत, कार्यकारी संचालक महेश जोशी, प्रांत अजय नष्टे,तहसीलदार जीवन बनसोडे,बाबासाहेब कोडग, निलेश बामणे,पिंटू व्हनमाने, महादेव पाटील,परशूराम मोरे,अरूण साळे,राजेंद्र माने,साहेबराव ‌कोळी,आकाश बनसोडे,दिनेश जाधव,समाधान शिंदे आदी उपस्थित होते.

 

लाड पुढे म्हणाले,माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या सुचनेनुसार आ.विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातील टंचाई निवारण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घ्या.
प्रशासनासोबत आपणही सहभाग नोंदवला पाहिजे.लोकांना शक्य तितकी मदत करण्याची भूमिका ठेवा असे सूचित केले आहे.आज आम्ही २० साठवण टाक्या प्रशासनाकडे सुपूर्द करत आहोत.

 

आणखीन काही मदत लागल्यास आ. सावंत सुचवतील त्या प्रमाणे पुढाकार घेऊन जत तालुक्यातील दुष्काळी जनतेला दिलासा देऊ, असे अभिवचन लाड यांनी दिले.यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी श्रीपती शुगरचे विशेष आभार मानले. या टाक्या आवश्यक त्या गावात, वाडीवस्तीवर पोहोच केल्या जातील, अशी ग्वाही बनसोडे यांनी दिली.
जत : दुष्काळ निवारणासाठी डफळापूरच्या श्रीपती शुगरकडून २० प्लास्टिक टाक्या प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आल्या.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here