जत : आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून जत तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या आमदार स्थानिक विकास निधी,अर्थसंकल्प,जनसुविधा,२५/१५ योजनेतून जत तालुक्यातील पाच्छापूर,मुचंडी,दरीकोनुर,दरी बडची,सिद्धनाथ,आसंगी तुर्क,कागनरी,को.बोबलाद,मोटेवा डी (को.बो),जालीहाळ बु ,करजगी,संख,आसंगी जत,गुड्डापूर आदी १४ गावातील १० कोटी ८९ लक्ष रु.विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते आज गुरूवार संपन्न झाले.
सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करून जत तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणला असून यापुढे तालुक्यातील प्रत्येक गावात विकास योजना राबवून विकसित गावे निर्माण करू,असेही या विविध उद्घाटने व शुभारंभ प्रंसगी आ.सावंत यांनी सांगितले. पाच्छापूर येथील शाळा खोल्या बांधकामासाठी २५ लक्ष रु,हरीबाची वाडी येथील सभामंडप कामासाठी १० लक्ष रु,पाच्छापूर बायपास रस्त्यासाठी ४५० लक्ष रु,मुचंडी येथील सवळ सिंधी ओढा ते पाच्छापूर पुलापर्यंतच्या रस्ता खडीकरण मुरमीकरण कामासाठी १० लक्ष रु,
दरीकोनुर येथील हिंदू स्मशानभूमी बांधकामासाठी व सुशोभीकरण कामासाठी ८ लक्ष रु,दरीबडची येथील खैराव कोळगिरी आसंगी तुर्क प्रजिमा ६९ कि.मी.२७/९०० ते २८ /२०० रस्ता कॉंक्रीटीकरण कामासाठी ७५ लक्ष रु,सिद्धनाथ येथील गावातील दलित वस्ती मुख्य रस्ता ते सिद्धेश्वर मंदिर रस्ता व गटार बांधकाम करणे कामासाठी २० लक्ष रु,सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे कामासाठी २५ लक्ष रु,
आसंगी तुर्क येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिर साठी १० लक्ष रु,आसंगी तुर्क येथील बसवण्णा मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामासाठी ५ लक्ष रु,कागनरी येथील कोळी वस्ती अंतर्गत सभामंडप कामासाठी १० लक्ष रु,को.बोबलाद येथील गावांर्तगत मुख्य रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून २५० लक्ष रु,