उमदी,संकेत टाइम्स : जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाबद्दल एक शब्दही न काढणाऱ्या जतच्या आमदार विक्रम सावंत यांना श्रेय घ्यायचा काय अधिकार आहे,शाश्वत पाण्यासाठी कधीही प्रयत्न न करता केवळ प्रसिद्धीसाठी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर पाण्याची गाजर दाखवत लोकांना दिशाभूल करून झुलवत ठेवण्याचे काम आमदारांनी केल्याची टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.उमदी येथील भाजपा आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगताप बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे,भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत,भाजपा जिल्हा मोर्चाचे संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, येत्या दीड वर्षात जतच्या शेवटच्या गावापर्यंत पर्यन्त आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी मिळणार आहे.भविष्यात तालुक्याला बारमाही पाणी मिळेल आणि तेंव्हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल,असे सांगून आता तालुक्याचा त्रिभाजन करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यामध्ये नव्याने उमदी तालुक्याची मागणी असेल असेही सांगितले.उमदी येथील विकास सोसायटीचे चेअरमन गोपाल माळी यांची उमदी शहर भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.त्यावेळी शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे यांचा संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी, शिवाजी चव्हाण यांचा भाजपा तालुका उपाध्यक्षपदी, भारत मोरे यांना भाजपा उद्योग सेल सदस्यपदी, दिलीप शेवाळे यांचा जत तालुका मराठा समाजाचे उपाध्यक्षपदी तर आपू कोरे यांची विकास सोसायटीचे स्वीकृत सदस्य निवड झाल्याबद्दल माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रकाश जमदाडे म्हणाले,जत विस्तारित सिंचन योजनेचे खरा शिल्पकार खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांनी आहेत जगताप साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे जत तालुक्याला दीड ते दोन वर्षात तालुक्याला पाणी मिळणार आहे.यावेळी प्रमोद सावंत, प्रकाश जमदाडे,निवृत्ती शिंदे आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार तर आभार गोपाल भोसले यांनी मानले.