जत : बिळूर ता.जत येथील श्री काळ भैरवनाथ देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत 2 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.मंजूरीबाबतची माहिती समोर येताच भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. या निधीतून या तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे.भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.