जत : जत तालुक्यातून जाणाऱ्या सातारा-विजापूर महामार्गावरील पाच्छापूर फाटा येथे कंटेनरने दुचाकीवरून चाललेल्या पती-पत्नीला धडक दिल्याने झालेल्या भिषण अघतात दोघाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
दरिबडची ता.जत येथील जाधव वस्ती येथे राहणारे दगडू उर्फ ज्योती खुशाबा जाधव वय ४८,व त्यांच्या पत्नी सौ.सिंदूबाई ज्योती जाधव वय ४५ असे ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की,दरिबडचीतील जाधव दांपत्य हे जत येथे आठवडा बाजारात खरेदीसाठी आले होते.खरेदी उरकून ते दरिबडचीकडे जात असताना विरूध बाजूने आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.
गुरूवार सायकांळच्या दरम्यान विजापूर-गुहागर महामार्गावर पाच्छापूर फाट्यानजिक हा भिषण अपघात झाला आहे.या घटनेने दरिबडचीतील जाधववाडीवर शोककळा पसरली आहे.दोघाच्या मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.अधिक तपास जत पोलिस करत आहेत.