जत पंचायत समितीकडील अपूर्ण असलेली घरकुले पुर्ण करावीत

0
14
जत : शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर असलेली घरकुलाचे बांधकाम अद्याप ज्या लाभार्थी यांनी सुरु केले नाही अशा लाभार्थी यांचेकडुन तात्काळ घरकुलाचे बांधकाम पुर्ण करुन घेणेच्या सूचना जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती नंदिनी घाणेकर यांनी दिला.त्या जिल्हा परिषद सांगली येथे नव्याने हजर होताच प्रथमच पंचायत समिती जत येथील सभागृहात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी यांचा आढावा घेतला.यावेळी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी जत तालुक्यातील घरकुलासंदर्भातील गेल्या वर्षभरातील केलेल्या कामाची माहिती दिली.
त्यापैकी एकुण 8994मंजुर घरकुलापैकी आजपर्यंत7528इतकी घरकुले पुर्ण झालेली आहेत तसेच घरकुलाचा पहिला हाप्ता जमा होऊनही ज्यांनी घरकुलाचे बांधकाम केलेले नाही अशा 442 बांधकाम करण्यास इच्छुक नसलेल्या  लाभार्थी यांचे खाते वरील जमा करण्यात आलेला पहिला हप्ता अनुदान रिफंड करून घेतला तसेच ज्यांनी घरकुलाचे पैसे परत भरले नाहीत अशा लाभार्थी यांचे ७/१२ उतारावर बोजा चढविण्यात आला आहे तसेच काही लाभार्थी यांचेवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेची माहिती सरगर यांनी दिली त्यांनी केलेल्या कामा बद्दल प्रकल्प संचालिका यांनी समाधान व्यक्त केले,कौतुकही केले.

 

जत सारख्या दुष्काळी भागात तसेच विस्ताराने मोठा असलेल्या तालुक्याचे एकीकडे जिल्ह्याच्या उद्दिष्टाच्या अर्धे उद्दिष्ट जत तालुक्याला असलेली उद्दिष्ट गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच पंचायत समिती कडील अधिकारी यांचे मदतीने पुर्ण करण्याच्या प्रयत्न केला आहे.पंरतू अजुनही काम करणे आवश्यक आहे ते येणाऱ्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.त्यासाठी बचत गटाची मदत घेवून घरकुल मार्ट योजनेच्या माध्यमातून लाभार्थी यांना एकाच ठिकाणी घरकुलाचे सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन लाभार्थी यांना घरकुले बांधण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे तसेच जे लाभार्थी घरकुल बांधण्यास नकार देत असतील अशा लाभार्थी यांचे खातेवर जमा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात यावी व तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे अशा सुचना दिल्या.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here