लोकसभेसाठी गट तट विसरून सर्वजण एकत्र | तम्मनगौडा रवीपाटील यांची महायुतीच्या बैठकीत माहिती
जत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी व संजयकाका पाटील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जत तालुक्यातील महायुतीचे सर्व नेते व कार्यकर्ते गट तट विसरून एकत्र आले असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दिली भाजप व महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज येथील भाजपच्या वार रूममध्ये संपन्न झाली. या बैठकीत बोलताना रवीपाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. मी पक्षाचा एक निष्ठावंत व कट्टर कार्यकर्ता आहे.
भाजप पक्षासाठी सर्व मानपान विसरून एक पाऊल मागे यायला मी तयार आहे. माझ्यापेक्षा तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत. माजी आमदार विलासराव जगताप, डॉ रविंद्र अरळी यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली आहे. जेष्ठ नेत्यांबद्दल आपणास नितांत आदर आहे. माझे काही चुकले तर जेष्ठांची क्षमायाचना करेन. सध्याची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी देण्यासाठी आहे. त्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा विजय करण्याची सर्वांनी शपथ घेऊया. मागील दोन्ही वेळापेक्षा यावेळी संजयकाका पाटील यांना अधिक मताधिक्य मिळेल असेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस उद्योजक सुभाष गोबी, सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी, मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल बापू निकम, शिवसेना जत विधानसभा निवडणूक प्रमुख निवृत्ती शिंदे, नगरसेवक टीमू एडके, प्रमोद हिरवे, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, चर्मकार महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण शिंदे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे- पाटील, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामान्ना बंडगर, भटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष हणमंत गडदे , किसान मोर्चा जिल्हापाध्यक्ष रावतराय तेली, रमेश देवर्षी, प्रा प्रदीप जाधव, सरपंच विजय नामद, रामलिंग निवर्गी, अन्नेश हेळवी, मिरासाहेब मुजावर, सौ. वसुधा महादेव हिंगमिरे, महादेव हादीमनी, सोमनिंग चौधरी, रामचंद्र पाटील, लिंबाजी माळी, महिला आघाडी अध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने, रयत क्रांतीचे राजू पुजारी, बसगोंडा चौगुले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.