महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २१ जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, १७ जागांवर काँग्रेस आणि १० जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष निवडणूक लढविणार आहे.आज मंगळवारी राजधानीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. या जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रातील महत्व चाचा व कॉग्रेसचा प्रभाव असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघ अखेर उद्धव ठाकरेंची शिवसेनाच निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
घोषणा झालेले चंद्रहार पाटील या पैलवान अखेर उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे.दरम्यान काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे पाटूटीलसह कॉंग्रेसचे नेते आता काय भूमिका याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम हे प्रयत्नशील होते. मविआच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी कदम यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अनेकदा भेटीगाठीही घेतल्या. मात्र कदम यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेले चंद्रहार पाटील हेच मविआचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.
अशा स्थितीत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले विशाल पाटील हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.दरम्यान विशाल पाटील हे खरंच बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की त्यांची समज घालण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश येणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.