मुचंडीजवळ धाडसी चोरी,दोन लाखांचा ऐवज लंपास

0
6

जत : मुचंडी (ता. जत) येथे शिंदेवाडा वस्तीवरील लोकांना अनोळखी पाचजणांनी दमदाटी करीत व एकास दांडक्याने डोकीत व तोंडावर मारून जखमी केले.या वस्तीवरील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी अज्ञात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.मुचंडी येथे शिंदेवाडा वस्तीवरील सोमवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला.

 

लोकांना दमदाटी करत त्यांच्याकडील ४० हजार किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे काळे मणी मंगळसुत्र,२० हजार किंमतीच्या अर्ध्या तोळे अंगठी,७० हजार रूपये किंमतीचे अर्ध्या तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण व मुलीचे कानातील सोने ४१ हजार रोख रक्कम,५ हजार किमतीचे २१ इंची एलसीडी टिव्ही,२० हजार किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची कर्णफुले असा मिळून एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

 

दरम्यान, मलिकार्जुन हणमंत कुलंगी हे आपल्या कुटुंबासमवेत घरात झोपले असताना पाचजणांनी येऊन त्यातील एकाने ‘निचे बैठो आवाज नहीं निकालनेका, आवाज निकला तो मारूंगा’अशी दमदाटी केली, तसेच राजकुमार मलगोंडा जाल्याळ यांना दांड्याने कपाळावर मारून जखमी केले. घरातील महिलेला धमकावून कानातील कर्णफुले सोने लुटले.

 

दरोडेखोर हे हिंदी व कन्नड भाषा बोलत होते. १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात कुलंगी यांनी फिर्याद दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here