मिरज : सांगली,मिरजेत एक महिन्याच्या उपवासानंतर आज (गुरुवार) ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला.ईद-उल-फितरची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांची उपस्थित होती.ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज अदा केली.यावेळी धार्मिक विधी प्रवचन मौलाना ब्रूहानुद्दीन खतीब यांनी केले. तसेच खुदबा पठण केले.
हाफिज निजामुद्दीन संदी यांनी नमाज पठण केले.देखरेख व साफ सफाई मेहबूब आली मनेर यांनी केले. विविध सामाजिक संघटने कडून सरबतचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मिरजेचे डी वायएसपी प्रविण गिल्डा,मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ,खासदार संजयकाका पाटील,काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा नेते विशाल पाटील,शिवसेनेचे चंद्रहार पाटील,नगरसेवक निरंजन आवटी,नगरसेवक संजय मेंढे,नगरसेवक गजानन कल्लोळी,जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम,शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव,काँग्रेस पक्षाचे आय्याज नाईकवाडी,महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबदीन शेख,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पद्माकर जगदाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार, महाराष्ट्र पब्लिकन पार्टीची युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासीर शेख, शिवसेनेचे चंदू मयगुरे, महाराष्ट्र पब्लिक पार्टीचे मिरज युवा उपाध्यक्ष साद गवंडी, पप्पू कोळेकर सहीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-उल्-फितरच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे, व भारत देश जगात बलाढ्य देश म्हणून नावलौकि व्हावे असे अल्ला चरणी प्रार्थना करण्यात आले
मिरज इदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद-उलफीतरचा सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या.पोलीस प्रशासनाच्या वतीने एकदा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केले होते.यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे आभार ही मानण्यात आले.