सांगली : महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, तीन दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. मविआ नेत्यांनी यावेळी तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जागावाटपात कोणत्या जागा मिळाल्या आहेत याची यादीदेखील जाहीर केली. या यादीद्वारे सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
सांगलीतून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील प्रयत्न करत होते. त्यांना सांगलीतल्या इतर काँग्रेस नेत्यांचा पाठिंबाही आहे.विशाल पाटील यांचे बंधू माजी खासदार प्रतिक पाटील यांनी नुकतीच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पांठिबाही देऊ व निवडूनही आणू असे उद्गार काढल्याने विशाल पाटील यांची बाजू आनखीन मजबूत झाली आहे.