संख : संख(ता.जत) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 3 कोटी 70 लाखापैंकी, 3 कोटी 12 लाख (NPA)थकबाकी वसुली केल्याबद्दल संख येथील विविध कार्यकारी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे संचालक तथा निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन सुभाष पाटील,सोसायटी चेअरमन मैनूद्दीन जमादार व्हाईस चेअरमन यल्लाप्पा बिरादार,सर्व संचालक व सचिव मलगोंडा बिरादार यांचा सत्कार बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब,सरदार पाटील,बँकेचे सीईओ एस.टी.वाघ यांच्याहस्ते करण्यात आला.
बँकेचे सीईओ एस.टी.वाघ यांनी (NPA)थकबाकी वसुली करून,द्या तुमचा सत्कार करत, सोसायटीची टोलेजंग इमारत बांधून देऊ असे आश्वासन दिले होते.आश्वासनानुसार सोसायटी पदाधिकारी, संचालक यांनी शेतकऱ्यांच्यात जागृत्ती करून 3 कोटी 70 लाखापैंकी तब्बल 3 कोटी 12 लाख (NPA)थकबाकी वसुली करून दिली आहे..तसेच O.T.S मधील 143 सभासदा पैंकी 16 सभासद, O.T.S. योजनेचे लाभ घेतलेले आहेत.सर्व सभासदांनी 30 जून 2024 अखेर पर्यंत व सोसायटीचे सर्व सभासदांनी कर्ज भरून नुतनीकरण करून घ्यावे तसेच O.T.S.योजनेचा मुदत वाढ दिलेले आहे,त्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वाघ यांनी केले.
यावेळी सुभाष पाटील म्हणाले की,सोसायटीचा एनपीए जादा असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अडचणीचे ठरत होते.आम्ही थकीत शेतकऱ्यांना सोसायटीचे महत्व पटवून देत वसूली करत एनपीए कमी केला आहे.यामुळे सोसायटी नवीन इमारत बांधकाम करण्याचे माजी जि.प.उपाध्यक्ष स्व.बसवराज काका पाटील यांचे स्वप्नं पुर्ण होणार आहे.सोसायटी बांधकामासाठी बँकेकडून बिन व्याज 20 लाख रुपये देण्याचे पत्र दिले असून लवकरच इमारत बांधकाम पूर्ण होईल.सोसायटीचे नुतन सभासद व जुने सभासद यांना लवकरचं कर्जपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
सोसायटीचे सर्व संचालक मंडळ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयगोंडा बिरादार,आय.एम.बिरादार सर,पोलीस पाटील सुरेश पाटील,मालिकार्जून सायंगाव, साहेबराव ठोणे,माजी चेअरमन आय.बी.कन्नूरे,हेड ऑफिसचे व्यवस्थापक एस.एम.काटे,एस.बी.सावंत,ए.बी.मा ने,तालुका अधिकारी राजू कोळी,साजिद मुलाणी, हबीब कुलकर्णी,विजयकुमार पाटील,फिरोज गंवडी, फील्ड ऑफिसर गुरुराज मल्लिकार्जुन सायगांव,मॅनेजर अशपाक मणेर आदी मान्यवर,सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा बँकेचा एनपीए थकबाकी कमी केल्याबद्दल सोसायटी संचालकांचा सत्कार करताना बँकेचे संचालक व सीईओ एस.टी.वाघ व मान्यवर