जत : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत कोळीगिरी ता.जत येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.यामध्ये गावातील सर्व शासकीय कर्मचारी,आजी माजी सैनिक,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,बचत गट प्रतिनिधी, पोलिस पाटील,यांची गावांमध्ये बैठक घेतली.गावातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विविध कार्यक्रम राबवून मतदारांना प्रवृत्त करण्याचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, प्रभातफेरी,नवमतदारांचा व जेष्ठ मतदारांचा मेळावा,रन फॉर ओट असे विविध प्रकारचे उपक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असलेची माहिती जि.प.शाळा वळसंग केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव भोसले, ग्रामसेवक डी.एम.साळे यांनी दिली.यावेळी जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर,माळी सर,केंद्रे सर, कांबळे सर ,घाडगे मँडम,मोमीन मँडम, हायस्कूलचे मुख्याध्यापक सौ.विणा हिरेमठ,राजेंद्र येळदरी,आनंदराव पांढरे,बिराप्पा पांढरे,नागाप्पा माळी, बसवराज सायगाव,
तिप्पाना बुध्दीहाळ,माजी सैनिक विठ्ठल डिस्कळ,श्रीशैल सिध्दरेड्डी अंगणवाडी सेविका अनिता कांबळे, लक्ष्मीबाई नरुटे,बचत गट प्रतिनिधी पुष्पा बाबर,मंगल साबळे,बबिता कांबळे,कृषी व पशु सखी अमृता हेळवी,पुष्पांजली पोतदार,गंगाबाई मुधोळ, ग्रामपंचायत कर्मचारी राजु चव्हाण,शिवाजी काटे, शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी भाग घेऊन मतदार जनजागृती अभियान राबविले.
कोळीगिरी ता.जत येथे मतदार जनजागृत्ती उपक्रम राबविण्यात आला.