उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करा !

0
25
एप्रिलच्या परीक्षा संपून शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत.उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल.मुलामुलींच्या आयुष्यातील एक आनंदाचा काळ म्हणावा लागेल.उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना भरपुर वेळ मिळतो.आणि हा वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागला पाहिजे.त्यासाठी मुलांनी सुट्टीचा सदुपयोग करून घेतला पाहिजे.उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाळी संस्कार वर्ग भरवली जातात.पुर्वी असे काही नव्हते.आता काळ बदलला आहे .काळ बदलत आहे तसं माणसाचे जिवन देखील बदलत चालले आहे.आमच्या लहानपणी आम्ही  उन्हाळ्यात सुट्टीत मामाच्या गावाला जायचो.हल्ली ते कमी होत चालले आहे.मामाच्या गावाला गेलं की रानातील बोरे,आंबा,चिंचा,कैऱ्या ,जांभळे आनंदाने खायची मज्जा भारीच असायची.
शिवाय विहीरीत मनसोक्त पोहायचे झाडे,झुडपे,वेली, निसर्गाच्या सान्निध्यात रमायचे ,फुलपाखरांच्या मागे धावायचं हे खुप छान वाटायचे.सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत.आणि बहुतांश पालकांना प्रश्न पडलेला असतो. की मुलांना कशात गुंतवून  ठेवायचे.खरं म्हणजे आजची मुले,मुली हुशार आहेत.ती सुज्ञ आहेत.त्यांच्यामध्ये उर्जा आहे.काहीतरी करण्याची क्षमता आहे.ते आपण ओळखले पाहिजे.त्यांच्यात उपजतच गुण असतात आपण ते हेरले पाहीजेत.खरं म्हणजे मुलांना नुसते ,टिव्ही, मोबाईल पुरते मर्यादित न ठेवता त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ द्या.त्यांना त्यांच्या आवडी निवडी छंद जोपासु द्या.आपल्या सभोवतालच्या विश्वात रमू द्या.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू द्या.त्यांना मनसोक्त ,खेळुद्या,बागडुद्या.

 

मग ते क्रिकेट असो ,विठी दांडु,सुरपारंब्या असो असे कितीतरी ग्रामीण खेळ आहेत .त्यांना खेळून दिले पाहिजे.आजच्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात रमू द्या.नवनवीन ठिकाणे पाहु द्या.खुप धमाल मस्ती करु द्या.मुलांना  पोहायला शिकवा.नवनवीन गोष्टी शिकवा.नृत्य,संगीत , छान छान चित्र,काढु द्या.त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुर्णपणे सदुपयोग करू द्या.कारण हे दिवस पुन्हा येत नाही.राहतात त्या फक्त आठवणी
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर, महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here