सांगली : आज सांगली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. नेमिनाथनगरातील कल्पदुम मैदानात झालेल्या ह्या सभेस उपस्थितांनी एकजूट दाखवत, हुकूमशाही उलथवण्याचा निर्धार केला.
ह्यावेळी पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे ह्यांनी ‘ज्या सांगलीला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे, तो सांगलीकर आता हुकूमशाहीच्या विरुद्ध एकजुटीने विरोधकांना गाडतील; हा मला विश्वास आहे,’ असं ठाम मत व्यक्त केलं.सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, आमदार विश्वजीत कदम, तेजस ठाकरे तसेच इंडिया-महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.