जत : ‘गाव तिथे सहकार’ या संकल्पनेतून जत तालुक्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकार पुन्हा रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत.गावागावात होत असलेल्या सहकारी संस्था या ग्रामीण भागाच्या आर्थिक कणा बनतील.छोटे-मोठे व्यवसायिक,शेतकऱ्यांना आर्थिक आधार बनणार आहेत.गावे या संस्थामुळे आर्थिक साक्षर होतील.नागरिकांच्या आर्थिक स्तर उंचावेल,असे प्रतिपादन जतचे दुय्यम निंबधक अमोल डफळे यांनी केले.
जत पुर्व भागातील सिमावर्ती गिरगाव ता.जत येथे विजयलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन अमोल डफळे यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी गिरगावचे सरपंच,उपसंरपंच,संस्थेचे चेअरमन,सर्व संचालक,सदस्य तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.अमोल डफळे म्हणाले,जत तालुक्यातील सहकारी संस्था सक्षम उभ्या राहाव्यात, त्यांची वसूली,आर्थिक भांडवल उभारावे यासाठी संचालकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.संस्था मोठ्या झाल्यातर गावातील उद्योग,व्यवसाय वाढतील.
गिरगाव ता.जत येथील विजयलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना अमोल डफळे