भोसरी व पिंपरी चिंचवडला आधुनिक शहर बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध..
शिरूर लोकसभेचे महायुती (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी, पुणे येथे आयोजित भव्य जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
‘क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील” हे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीच्या निवडणुकीनंतर केले. आणि आता वारं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दिशेने बदललय, हे निश्चित झाले. 4 जून नंतर शरद पवार उद्धव ठाकरेंना घेऊन काँग्रेसमध्ये जातील, मात्र काँग्रेस ही बुडती नौका असल्याने त्यांनी काँग्रेस मध्ये न जाता अजितदादा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत यावे, असे मा. मोदीजी म्हणाले.
पिंपरी चिंचवडसहित भोसरी परिसर गेल्या काही वर्षांमध्ये मोठा झाला. राज्यातील सर्व भागातील लोक येथे वास्तव्यास असल्याने हा भाग छोटा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्यामुळे या शहराशी जवळचा संबंध आला आणि शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले.
इंद्रायणी नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे तयार करण्यात येत आहे. येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी दुमजली व तिमजली रस्ते बांधण्याचा आराखडा तयार केला जात आहे. येथील खासदार मागील 5 वर्षांमध्ये मतदारसंघात फिरकले देखील नाहीत. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील खासदार नसतानाही जनतेची सेवा करत होते. त्यामुळे येथील मतदार आता महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील.यावेळी आ. महेशदादा लांडगे, आ. अश्विनीताई जगताप, आ. उमाताई खापरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.