जत : आमदार विक्रमसिंह सावंत याच्या आदेशानुसार माडग्याळसह 6 गांवात पाणी मिळणार असल्याने माडग्याळकरांनी एकच जल्लोष साजरा केला.
म्हैसाळ योजनेतील गावातील पिण्याचे व शेतीला पाणी विस्तारीत योजनेत देण्यात येणार आहे.तसेच भिषण पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार विक्रम सावंत यांनी तातडीने म्हैशाळ योजनेतील अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली होती.
या बैठकीत सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे,अशा गावात तातडीने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते.त्यानुसार रविवारपासून माडग्याळ,सोन्याळ,लकडेवाडी,उटगी , जाडरबोबलाद, उमदी,या सहा गावात पाणी पोहोचत असल्याने माडग्याळकरांनी एकच जल्लोष साजरा केला.यामुळे माडग्याळसह 6 गावातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रदीप करगणीकर, व्हण्णाप्पा माळी, प्रकाश भोसले, सचिन निकम, प्रकाश माळी,संताजी सावंत यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आहेत.
माडग्याळ परिसरात म्हैसाळ कँनॉलमधून पाणी सोडण्यात येत आहे.