डफळापूर : जत पश्चिम भागातील विविध समस्यासह जिल्हा बँकेच्या संदर्भातील अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे हे मंगळवारी जत पश्चिम भागातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.त्याशिवाय संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जमदाडे तालुक्यातील प्रत्येक गावात दौरा करणार आहेत.मंगळवार पासून या संवाद दौऱ्यास सुरूवात होईल,पुढील आठ दिवस संपूर्ण तालुक्यातील गावात हा संवाद दौरा पोहणार आहे.यातून प्रत्येक प्रश्न,समस्या जाणून घेऊन ती सोडविण्यासाठी जमदाडे यांची टिप प्रयत्न करेल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना,ओटीएस योजना,कर्ज पुरवठा या संदर्भातील प्रश्न,अडचणी सोडविण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.त्याचबरोबर दुष्काळाची तीव्रता,पाणी टंचाई,म्हैसाळ योजनेसंदर्भात समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.गावागावातील हे प्रश्न सोडविण्यासाठी जमदाडे हे हा दौरा करत असून नागरिकांच्या समस्यांची समुळ निराकारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
मंगळवार ता.२१ मे ला खलाटी येथून सकाळी ८ वाजता दौऱ्यास सुरूवात होईल,पुणे मिरवाड,जिरग्याळ,शेळकेवाडी,शिगणापूर,कुडणूर,अंकले,डोर्ली,हवरे,बाज,बेळुंखी,डफळापूर असा दौरा जमदाडे हे करणार आहेत.जिल्हा बँकेतील अडी-अडचणीसह,गावातील समस्या यावेळी नागरिकांनी मांडाव्यात असे आवाहन जमदाडे यांनी केले आहे.