सावधान ! देशात आणखी काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता

0

 
देशात बदलत्या हवामानामुळे निसर्ग आपले वेगवेगळे रूप धारण करीत आहे.यात अवकाळी पाऊस व उष्णतेच्या लाटेने आक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे आपण अधुनमधून पहात असतो.देशाच्या वायव्य भागात असणारी तीव्र उष्णतेची लाट आणखी पाच दिवस कायम राहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.या लाटेमुळे दिल्लीच्या आग्नेयेकडील नजफगड भागात दिनांक १७ मे शुक्रवारला ४७.४ अंश सेल्सिअस आणि हरियाणातील सिरसा येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.नजफगडमधील तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील देशातील उच्चांकी तापमान आहे.भारतातील ५४.३ कोटी लोकांना २१ मेपर्यंत तीव्र उष्णता जाणवेल,असा अंदाज अमेरिकेतील “क्लायमेट सेंट्रल” या हवामान विषयक संशोधकांच्या समूहाने नुकताच वर्तवला आहे.म्हणजेच देशातील बदलते हवामान मानवजातीसह संपूर्ण जीवसृष्टीसाठी दिवसेंदिवस कठीण समस्या निर्माण करीत असल्याचे दिसून येते.”वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन”या वेबसाईटवरील माहितीनुसार १९ मे २०१६ रोजी राजस्थानातील फालोदी येथे ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.हे देशातील सार्वकालिक सर्वोच्च तापमान मानले जाते.

 

 

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार २०२३ हे गेल्या १२२ वर्षांतील दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले होते.म्हणजेच येणारा पुढीलकाळ हा उष्णता वाढीचा राहु शकतो याला नाकारता येत नाही.एल-निनोचा परिणाम म्हणून एप्रिल महिन्यात जगभरातील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले व उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि असह्य झाल्याचे आपण पहाले.जागतिक तापमान वाढ सलग ११ महिने कायम रहाली, असे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नोंदविले आहे.जागतिक हवामान संघटनेने “कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्विस”आणि अमेरिकेच्या “नॅशनल ओशनिक ॲंड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन”च्या (नोआ) मासिक अहवालातील निरीक्षणाचा उल्लेख करून म्हटले आहे की, प्रशांत महासागरातील एल-निनोच्या स्थितीमुळे जगभरात तापमानवाढीचा कल कायम आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात दिवसेंदिवस विक्रमी तापमानाची नोंद होत आहे.यापुर्वी २०१५-१६ मध्ये प्रभावशाली एल-निनो सक्रिय असताना, अशाच प्रकारच्या तापमानवाढीचा सामना करावा लागला होता.बदलत्या हवामानामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान प्रकोपाच्या वाढत्या घटनांमुळे दैनंदिन तापमानातील चढ-उतार, कमी-जास्त पावसाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.तापमानातील वाढ व बदलते हवामान यामुळे जगभरात उष्माघातामुळे दरवर्षी दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.त्यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू एकट्या भारतात होत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.देशातील अनेक भागात आताही सुर्य आग ओकतांना दिसतो आणि हा संपूर्ण प्रकार दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेला आहे.

 

यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढु शकते अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.यावर्षी वेळेच्या आधीच सुर्याने आक्राळ – विक्राळ रूप धारण केल्याचे आपण पाहिले.अशा परिस्थितीत उष्णतामानासोबतच पाणी टंचाईचा सुध्दा सामना करावा लागणार आहे.कारण आतापासुनच नदि, तलाव, विहिरी यांच्या पाण्याची पातळी कमी कमी होत आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आपल्याला पहायला मिळेल.आतापर्यंत जवळपास राज्यात सर्वत्र सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे आपण पहिले. अशीच परीस्थिती देशातील अनेक भागात आपल्याला पहायला मिळेल.कारण मानवाने केलेला निसर्गाचा ह्यास यामुळेच आज आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे मानवाने केलेल्या पापाचे प्रायश्चित्त मानव तर भोगतच आहे आणि भोगावेच लागतील सोबतच पशुपक्षी, संपूर्ण जीवसृष्टी, पृथ्वी, आकाश-पाताळ, नदि-नाले, तलाव,विहिरी, समुद्र यांनाही भोगावे लागत आहे. याचा परिणाम जलचर प्राण्यांनासुध्दा होत आहे.

 

Rate Card

कारण राज्यासह देशातील वाढते तापमान हे दिवसेंदिवस निसर्गावर सरळ आक्रमक करीत असुन संपूर्ण निसर्ग ढासळत आहे त्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे  ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.त्यामुळे नागरिकांनी वाढत्या तापमानापासुन स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे.बदलत्या हवामानामुळे यावर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे आतापासूनच राज्यातील अनेक भागात आपल्याला पाणी टंचाई दिसून येत आहे. राज्यासह देशातील नागरिकांना विनंती करेल की वाढत्या तापमानामुळे काही दिवस उष्माघाताचा धोका आहे त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. बदलत्या हवामानामुळे देशासह जगात विपरीत परिणाम होत आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळे येणारा पावसाळा पहाता आतापासूनच सरकार, स्थानिक प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक यांनी वृक्षारोपणाचा आराखडा आखायला हवा.यामुळे बदलत्या हवामानावर थोडा का होईना अवश्य आपल्याला फरक जाणवेल.”झाडे लावा व बदलत्या हवामानावर अंकुश लावा”.

 

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.