घोडावत विद्यापीठास एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून रँकिंग | जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 व्या स्थानी 

0
12
जयसिंगपूर : एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना 2024-25 चे रँकिंग जाहीर करण्यात आले.यामध्ये भारतातील उत्कृष्ट 300 विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम,राज्यात पाचवे तर देशात 31 वे स्थान पटकावले.

 

उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.यामुळेच हे रँकिंग देण्यात आल्याची माहिती एज्युकेशन वर्ल्डकडून देण्यात आली आहे.

 

विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे.सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी  यांच्या कष्टामुळे विद्यापीठ जागतिक किर्तीस पोहचले आहे.संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन,प्राध्यापक,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here