तनिषा बोरमणीकरला बारावीत १०० टक्के गुण

0
मुंबई : राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. यात बारावीच्या परिक्षेत छत्रपती संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकरने १०० टक्के मिळविले आहे.तनिषा बोरमणीकरने संपूर्ण देशात संभाजीनगरचे नाव मोठे केले आहे. तनिषा ही अभ्यासासोबतच खेळातदेखील हुशार आहे. तनिषा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळते.
तनिषा ही अभ्यासात खूप हुशार आहे. बारावीत तिने १०० टक्के मिळवले आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण प्राप्त केले होते. तनिषाला मोठे होऊन सीए बनायचे आहे. ती सध्या सीए फाउंडेशनच्या परीक्षेची तयारी करत आहे.

फोटो कट करून लावा
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.