उमदी,संकेत टाइम्स : आदेश झाला आणि म्हैसाळ योजनेची पाणी माडग्याळ ओढ्यातून दोड्डानाला तलावात सोडण्यात आले आणि माडग्याळकर जलोष केला. मात्र उमदीकरांनी काय घोडा मारलंय की त्यांना पाणी सोडत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया उमदीतील शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.जत पूर्व भागातील शेतकऱ्यासाठी दोड्डानाला तलाव बांधण्यात आले आहे,मात्र त्या तलावाचा उमदीसाठी कांहीं उपयोग होत नसेल तर तलाव बांधून काय फायदा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडग्याळ ओढ्याला पाणी सोडण्यात आले.
त्यावेळीही दोड्डानाला तलाव पर्यन्त पाणी पोहचताच पाणी बंद करण्यात आले.माडग्याळ ओढ्याला पाणी सोडताना राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटाने कार्येक्रम आयोजित करून पाणी सोडण्यात आले.त्या कार्यक्रमाला उमदीतील शेकडो शेतकरी आम्हालाही पाणी येणार या आशेने खास उपस्थित होते.मात्र उमदी पर्यन्त पाणी सोडलेच नसल्याने शेतकरी नैराश्य झाले मात्र आता पुन्हा एकदा माडग्याळ ओढ्यातून पाणी सोडण्यात आले आहे.आतातरी तलावाच्या खालच्या गावाला पाणी येणार की मध्येच बंद होणार आहे,याची खात्री दिसत नाही.
त्यामुळे उमदी येथील शेतकरी चिंतेत आहेत.माझ्यामुळेच पाणी आल्याचे कांगावा अनेक राजकीय नेते करत आहेत. मात्र माझ्यामुळेच उमदीला पाणी सोडण्यात आले नाही म्हणून जबाबदारी स्वीकारायला कुणीच तयार नसतात. त्यामुळे उमदी शेतकरी काय घोडा मारलंय की खाली पाणी सोडलं जातं नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.