आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणीच गावचा सुपुत्र सचिन सर्जेराव खिलारीने जपानच्या कोबे मध्ये सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम नोंदविला !*. कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीचे माजी सभापती, लोणारी समाजाचे महाराष्ट्राचे नेते, सुसंस्कृत, सभ्य, उच्च विद्याविभुषीत राजकारणी, करगणीचे दिवंगत कृषीभुषण शेतकरी कै.सर्जेराव रंगनाथ खिलारी यांचा कर्तृत्वसंपन्न सुपुत्र, चतुरस्त्र अभियंता, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक दिव्यांग सचिन सर्जेराव खिलारी याने जपान येथील कोबे येथे सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम करीत नवा इतिहास नोंदवून भारताचे नाव जगात उंचावले.सचिनने याच्या पूर्वीचा १६.२१ मीटर गोळा फेकण्याचा विक्रम जपान कोबे येथे १६.३० मीटर लांब गोळा फेकुन स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढला.
यापूर्वीही सचिनने पॅरिस झालेल्या पॅरा ॲथलेटीक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ( पॅरालिम्पिक ) स्पर्धेतही १६ . २१ मीटर लांब गोळा फेकून सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम नोंदविला होता.सचिन हा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे . पुण्याच्या आझम स्पोर्टस् अकॅडमीमध्ये प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सराव करतो तसेच पॅरालिम्पिक स्पोर्टस असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी यांचे ही लाख मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले .
जपानमध्ये माणदेशी आटपाडीच्या करगणीचा नावलौकीक द्वीगुणीत केल्याबद्दल सचिनचे, त्याच्या परिवारातल्या सर्वांचे, सचिनला सहकार्य करणारे आझम कॅम्पसचे सर्वेसर्वा डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती, महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष पीरपाशा अब्दुलरजाक हुसेनी इनामदार उर्फ डॉ.पी.ए. इनामदार साहेब , गुलजार शेख, सचिनच्या मित्र परिवाराचे,त्याचे शिक्षक,प्रशिक्षक, शिक्षण संस्थाचे, आटपाडी तालुक्यातुन तसेच सांगली जिल्ह्यातून व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनकडून खुप खुप कौतुक होत आहे…