सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध असून कुठेही चारा टंचाई नाही . पशुधन जगविण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी डॉ .राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले.
जतमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या थोड्या फार प्रमाणावर जाणवत असून नागरिकांच्या आवश्यकतेनुसार तसेच प्रचलित धोरणानुसार टँकरद्वारे पुरेशा प्रमाणावर पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगून तालुक्यासाठी आणखीन पाण्याचे टँकर लागल्यास प्रशासनातर्फे ते पुरविण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांनी आश्वस्त रहावे.विचलित होवू नये. त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नये.जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी सदैव तत्पर असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले .