पंढरपूर-उमदी-विजयपूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे मञ्यांची भेट घेणार 

0
3
उमदी,संकेत टाइम्स : नूतन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच भेट घेवून जत पूर्व भागातून जाणारा पंढरपूर उमदी विजयपूर रखडलेल्या मंजूर रेल्वे मार्गाची पाठपुरावा करून रद्द झालेल्या रेल्वेमार्ग पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती जत तालुका भाजपा विधासभा प्रमुख तम्मणगौडा रवीपाटील यांनी दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना दिली.

 

 

रवी पाटील म्हणाले,अनेक वर्षापासून रेल्वे मार्गाची मागणी जत पूर्वभागातील जनतेतून केली जाते मात्र या ..ना.. त्या कारणाने रेल्वे मार्ग मंजूर होवून रद्द करण्यात आले आहे.जत पूर्व भागातून जाणारा पंढरपूर उमदी विजयपूर रेल्वे मार्गाची अनेकवेळा सर्व्हे करण्यात आले आहे.त्यामुळे सर्व्हे पाहून येथील जनतेत आनंदाची बातमी पसरली असताना अचानक मंजूर झालेल्या रेल्वे मार्ग किरकोळ कारण पुढे करून रद्द करण्यात आले.त्यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.
या भागातून रेल्वे आणि जवळच असलेल्या कर्नाटकातील विजयपूर येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमानतळ बनविण्यात आले आहे.त्यामुळे जत पूर्वभागातील नागरिक, शेतकऱ्यांना ऐतिहासिक शहरे कमी वेळेत आणि कमी खर्चात जवळ येणार आहे.

 

 

रवीपाटील म्हणाले,या भागातून रेल्वे मार्ग झाल्यास सामान्य शेतकऱ्यांना देखील आपल्या शेतातून पिकविलेल्या पिकांची मुंबई सारख्या शहरात विक्रीसाठी नेता येते त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.जत तालुका द्राक्ष आणि उच्च दर्जाचे बेदाणा उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागातून रेल्वे गेल्यास त्याचा फायदा द्राक्ष बागाईतदाराना मोठ्या प्रमाणात होणार आहे.त्यामुळे नूतन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच भेट घेवून रेल्वे मार्गाची पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here