जत: जत ग्रामपंचायत व नगरपालिका स्थापनेपासून वंचित असलेल्या जत शहरातील उपेक्षित जातींना भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी न्याय दिला आहे. त्यांच्यासाठी नऊ सभामंडप मंजूर करून आणले आहेत. जत शहरासाठी विविध कामांना चार कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याकडून मंजूर करून आणला आहे.
भाजपची जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील व भाजपचे जत मधील नेते यांनी जत शहरातील अपेक्षित समाजांना न्याय देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे जर शहरातील ब्राह्मण, गोंधळी, वडार, डवरी, नाभिक, परीट, कोळी , कैकाडी अशा नऊ समाजातील समाज बांधवांसाठी सभागृहांना मंजुरी देण्यात आली आहे. आजखेर या समाजाला समाजमंदिर अथवा सभागृह नव्हते. या उपेक्षित समाजासाठी निधी मंजूर केला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 2 कोटी 55 लाख रुपये व विशेष रस्ता अनुदानातून 1 कोटी 45 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर कामे पुढील प्रमाणे…
वाचनालय चौक येथील मारुती मंदिर येथे सभामंडप बांधणे. (२० लक्ष), नाभिक समाज सभागृह बांधणे. (१० लक्ष), प्रजापती ब्रम्हकुमारी शांती सभागृह बांधणे. (१५ लक्ष), गोंधळी समाज सभागृह बांधणे. (२० लक्ष), वडर समाज सभागृह बांधणे. (१५ लक्ष), दत्त मंदिर ब्राम्हणपुरी येथे सभामंडप बांधणे. (१५ लक्ष), कैकाडी समाज सभागृह बांधणे. (१५ लक्ष), परीट समाज सभागृह बांधणे. (१५ लक्ष), कोळी समाज सभागृह बांधणे. (३० लक्ष), प्रभाग क्र.१० येथील शिवलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व अंतर्गत रस्ते करणे. (६० लक्ष), मुस्लीम समाज स्मशानभूमी वजुखाना करणे (विठ्ठल नगर येथील) (१५ लक्ष), मोरे कॉलनी दुय्यम निबंधक कार्यालय समोरील ओपन स्पेस विकसीत करणे. (२५ लक्ष).
कडीमळा जत येथील अंतर्गत रस्ते सिमेंट ट्रिमिक्स रस्ते तयार करणे. (३० लक्ष), मधुकर शिंदे घर ते मेसाजी खांडेकर घर सिमेंट रस्ता तयार करणे. (३० लक्ष), श्रीमंत साळे घर ते दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे. (३० लक्ष), प्रभाग क्र.९ येथील बबन देशपांडे घर ते राजू काळगी घर रस्ता ट्रिमिक्स करणे. (१५ लक्ष), प्रभाग क्र. १० येथील साईलीला कॉलनी येथे अंतर्गत गटार करणे व अंतर्गत रस्ते करणे. (४० लक्ष),