स्वच्छ, मागणीनुसार पाणी पुरवठा करा | – आ.विक्रमसिंह सावंत

0
10

जत : तालुक्यातील पुर्व भागात आजही पाणी टंचाईची दाहकता कायम आहे,त्यामुळे नागरिकांना टँकरने स्वच्छ व मागणीनुसार पाणी पुरवठा करावा,असे प्रशासनाला आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निर्देश दिले.

 

आमदार सावंत यांनी उटगी येथे दैडनाला तलाव येथे म्हैशाळ योजनेच्या सोडलेल्या पाण्याची पाहणी केली व त्या तलावातुन 4O गावांना पाणी पुरवठा करत असलेल्या टँकरची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात तलावातील पाणी स्वच्छ आहे का ? पाणी योग्य प्रकारे गावांपर्यंत पोहोचत आहे का ? यामध्ये कोणत्या अडचणी किंवा अडथळे आहेत का ? टँकर पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करू शकतात का ? तसेच त्यांची क्षमता आणि कार्यक्षमता याबाबत माहिती घेतली आणि पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार होतो आहे का ? त्यात काही बदलांची आवश्यकता असल्यास ती त्वरित केली जाणेबाबत सूचना करीत इतर बाबींची माहिती घेतली.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here