राहुल गांधी खासदारकीचा राजीनामा देणार

0
9

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी हे रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार असून वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासाठी वायनाडची जागा सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

मग शेट्टींना आम्ही कसे फसवले?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत यावेत, यासाठी पहिल्यापासून मी प्रयत्न केला; पण त्यांना फक्त उद्धवसेनेचीच सोबत हवी होती. दोन्ही काँग्रेससोबत येण्यास नकार दिल्याने वरिष्ठ पातळीवर समज-गैरसमज झाला. आम्ही कोणाचीही फसवणूक केली नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लक्ष्मण हाकेंची प्रकृती ढासळली
जालना : येथील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारच्या मनधरणीनंतर स्थगित झालेले असले तरी मात्र ओबीसी समाजाने नाराज होत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. हाके यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उच्च रक्तदाब आणि शुगर वाढले असून, त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी विनंती केली, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. दरम्यान पंकजा मुंडे यांनी हाके यांच्या उपोषणाबद्दल ट्विट करत सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

पराभवानंतर नवनीत राणा यांचे मानसिक संतुलन बिघडले – बच्चू कडू

कराड : नवनीत राणा सतत टी.व्ही.वर दिसायच्या त्यामुळे राणा जरा दबुन गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. त्यामुळे स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या नवनीत राणाला पाडले आहे. पण पराभवानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, पराभव त्यांना पचवता येत नाही. आता मलाच त्यांच्याकडे डॉक्टरांना पाठवावे लागेल अशी बोचरी टीका प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चूकडू यांनी केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here