जत : जत तालुक्यातील भीषण दुष्काळामध्ये जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने आणि प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल सभागृहाचे लक्ष वेधून घेत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आपली नाराजी व्यक्त केली.जतमध्ये दुष्काळीची तीव्रता आ.विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडत सभागृहाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
आमदार सावंत म्हणाले,शासनाने आणि प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीमध्ये नुसती वेळ काढूनपणा करून शेतकऱ्यांना आणि जनावरांना वाऱ्यावर सोडले असून जनावरांचे चाऱ्यासाठी हाल होत आहेत. जत तालुक्यामध्ये पीएम किसान योजना आणि कृषी सन्मान निधीबाबत स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही,त्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून शासन स्तरावरून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे ठरले असताना चार महिने झाले अजून काहीही बदल झालेला नाही.याकडे सभागृहाचे लक्ष लक्ष वेधून शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सदरचा योजनाच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही आमदार सावंत यांनी केली.
जत तालुक्यातील म्हैशाळ योजनेतील बाधीत जमीनीचे तात्काळ स्पॉट पंचनामे व नुकसान भरपाई द्यावी.राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले कि, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सर्व महापुरुषांची नावे घेतले परंतु महिला शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्यांना विसर पडला.तसेच जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम सुरू असून त्यांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे सांगितले.तसेच जत तालुक्यातील कन्नड शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या भरती झालेली असून ती दुरुस्त करण्याची मागणी केली.
पावसाळ्यात सांगली,सातारा ,कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते.यावेळी सांगली जिल्ह्यातील जत, मिरज,कवठेमहांकाळ ,तासगाव,सांगोला ,मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी असणारी म्हैसाळ योजना कार्यन्वित करून या तालुक्यातील सर्व तलाव ,बंधारे भरून दिल्यास त्याचा लाभ जत या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून याबाबत तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आ.विक्रमसिंह सावंत यांनी सभागृहात केली.त्याशिवाय आमदार सावंत यांनी जतचे ज्वलंत प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडले.