जत : गतवर्षीच्या खरीप हंगामातील १ रुपयात पीक विमा या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच जत तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक लाभ झाला आहे. खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ६२ लाख १६ हजार ५७६ इतकी बिमा परतावा रकम मिळणार आहे. मात्र तूर उत्पादक २८ हजार शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. या योजनेचा तब्बल १ लाख १६ हजार २७२ इतक्या शेतकन्यांना विक्रमी लाभ होणार आहे. बामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय कृषी पीक योजनेतून खरीप हंगाम २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, मका, तूर या पिकांच्या नुकसानीपोटी १ लाख ४४ हजार ४८२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. कृषी विभागाच्यावतीने दोन्ही हंगामातील पीक कापणी प्रात्यक्षिक करून नुकसानीची, सरासरी पाच वर्षांची उत्पन्नाची टक्केवारी गृहीत धरून नुकसान केले.. यानुसार भारतीय कृषी बीमा या कंपनीने ७० टक्के जोखीम स्तर निश्चित केला आहे.
त्याचबरोबर हेक्टरी एक रुपयात पीक विमा उतरवला जात आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याकरिता ऑनलाईन माहिती व विहित रक्कम भरली होती. गतवर्षीच्या खरीप हंगामात महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना गावपातळीवर व तळागाळातील घटकापर्यंत पीक विमा योजनेचे महत्त्व पटवून दिले होते. याचाच फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.
शेतात विमा घेतलेले पीक नसेल,तर आपणास विमा नुकसान कडे भरपाईपासून वंचित राहावे लागेल. महसूल मंडलामधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना येणाऱ्या कडे उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ७० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.पीक विमा अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा, नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधारसंलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. बँक खाते आधारसंलग्न,अधिकृत असणे आवश्यक आहे
विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे..
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व / लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणीपश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान व अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे.
जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ रुपयात या हंगामातील पीक
विमा, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहरकरिता शेतक-यांनी सहभाग नोंदवावा. पीक विमा योजना खरीप हंगामात सहभागाकरिता मुदत १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
– प्रदीप कदम, तालुका कृषी अधिकारी, जत