डफळापूर : डफळापूर गाव भागातील महत्वाचा असणाऱ्या बाजारपेठेतील रस्त्यासह अन्य पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली होती.त्यानुसार आ.पडळकर यांनी बाजारपेठेतील रस्त्यासाठी ३० लाखाचा तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर अन्य विकास कामांनाही लवकरचं निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही आ.पडळकर यांनी चव्हाण यांना दिले होते.
डफळापूर गावातील मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती.पाईपालाईनच्या खुदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.आता या निधीतून हे काम करण्यात येणार असून आहे.त्याचबरोबर रस्त्याच्या कामाला निधी कमी पडला तर आणखीन निधी देऊ असेही आ.पडळकर यांनी सांगितले आहे.
डफळापूर गावातील डफळापूर गावातील बाजारपेठ रस्ता डांबरीकरण करणे,बाजारपेठ ते रंगनाथ पोतदार रस्ता व गटारी करणे,मिरवाड रस्ता ते कापूरवडा रस्ता मुरमीकरण करणे,कुडणूर फाटा ते प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांना निधी द्यावा, अशी मागणी आ.पडळकर यांच्याकडे दिग्विजय चव्हाण यांनी केली होती.
त्यानुसार तात्काळ गरज असलेल्या डफळापूर बाजारपेठेतील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे बाजारपेठेतील रस्ता सीमेंट कॉक्रीटमुळे चकाचक होणार आहे.दरम्यान अन्य कामांनाही निधी मिळणार असून ती कामे लवकरचं होतील असेही चव्हाण म्हणाले.
महत्वाचा प्रश्न मार्गी
डफळापूर बाजारपेठेतील रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसापासून होता.त्यासाठी आम्ही निधी मागणी करताच आ.पडळकर साहेब यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.हा रस्ता सीमेंट कॉक्रिटचा मजबूत होणार आहे.
-दिग्विजय चव्हाण
सदस्य,पंचायत समिती