जत : जत विधानसभेचे दावेदार असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्याला तब्बल ६०० गाड्या भरून जत तालुक्यातील ओबीसी बांधवांना नेहत तुफान शक्ती प्रदर्शन केले.या सहाशे गाड्या जत शहरातून रॅलीने घेऊन जात येत्या विधानसभा निवडणूकीत आपली उपलब्धता प्रा.कोळेकर यांनी दाखवून दिली आहे.
जत तालुक्यातील अगदी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांला हात घालत त्या सोडवण्यासाठीच मी विधानसभा आखाड्यात उतरलो आहे हे नुकत्याच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तालुक्यातील गावागावात डिजिटल फलक लावत त्यांनी निश्चित केले आहे. त्यांना तालुकाभर यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.गत काहीपासून दिवसात प्रा.राजेंद्र कोळेकर सर यांनी तालुका पिंजून काढला आहे. तालुक्यात फिरत असताना त्यांना जाणवलेल्या जतच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी एक श्वेतपत्रिका बनवून जतचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.जत शहरातील आर के नगर या भव्यदिव्य निवासी प्लॉटचा प्रोजेक्ट साकारून जत शहराला नवी दिशा दिली आहे.लोकांविषयी प्रंचड तळमळ असणाऱ्या प्रा.राजेंद्र कोळेकर यांनी जत तालुक्यासाठी काहीतरी करायचं म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे.त्याचबरोबर त्यांनी गेल्या चार महिन्यापासून मोठी तयारीही सुरू केली असून तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.त्याशिवाय प्रा. कोळेकर यांचा दांडगा अभ्यास,अनुभव जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नवी पहाट आणेल असा विश्वास तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे.त्यामुळेच कोळेकर सर यांच्या हाकेला ओ देत तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोती उपस्थिती दाखविली आहे.मेळाव्याला गर्दी जमवत प्रा.कोळेकर यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील झलक दाखविली आहे.





