जत : जत विधानसभेचे दावेदार असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्याला तब्बल ६०० गाड्या भरून जत तालुक्यातील ओबीसी बांधवांना नेहत तुफान शक्ती प्रदर्शन केले.या सहाशे गाड्या जत शहरातून रॅलीने घेऊन जात येत्या विधानसभा निवडणूकीत आपली उपलब्धता प्रा.कोळेकर यांनी दाखवून दिली आहे.

त्याशिवाय प्रा. कोळेकर यांचा दांडगा अभ्यास,अनुभव जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नवी पहाट आणेल असा विश्वास तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे.त्यामुळेच कोळेकर सर यांच्या हाकेला ओ देत तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोती उपस्थिती दाखविली आहे.मेळाव्याला गर्दी जमवत प्रा.कोळेकर यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील झलक दाखविली आहे.