संख : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट, दरीबडची येथे कॉग्रेसच्या कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली.या आमदार विक्रमसिंह सावंत हे प्रमुख उपस्थित होते.बैठकीत निवडणूक तयारीबाबत सखोल चर्चा झाली.
बैठकीला स्थानिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकात्मतेने निवडणुकीवर भर देऊन काम करण्याचे आवाहन केले. तसेच, आधुनिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून प्रचार आणि जनजागृतीचे धोरण आखण्यावर चर्चा झाली.