विधानसभेसाठी भाजपा देईल ‌त्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम | दिग्विजय चव्हाण यांची जनकल्याण संवाद पदयात्रेत भूमिका स्पष्ट

0
17
जत:जत विधानसभेसाठी भाजप देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू अशी स्पष्ट भूमिका माझी पंचायत समिती सदस्य व भाजप युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष दिग्विजय चव्हाण यांनी मांडली.भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याण संवाद पदयात्रेचे आज बुधवारी दुपारी डफळापुर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य व युवा नेते दिग्विजय चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी संचालक अभिजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डफळापूर नगरीतून भव्य रॅली काढण्यात आली. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करीत महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले.

 

डफळापूर येथे भव्य संवाद सभा घेण्यात आली. प्रारंभी अभिजीत चव्हाण यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी बोलताना दिग्विजय चव्हाण म्हणाले की, आज डफळापुर व पश्चिम भागात म्हैसाळ योजनेची जी कामे झाली व पाणी आले, या भागाचे नंदनवन झाले, त्याचे संपूर्ण श्रेय भाजप सरकारला आहे. तम्मनगौडा रवीपाटील हे भाजप सरकारने केलेली कामे जत तालुक्यातील घरांघरापर्यंत पोहोचविण्याचे काम जनकल्याण संवाद पदयात्रेच्या माध्यमातून करीत आहेत, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, स्व. सुनीलबापू चव्हाण हे माझे राजकारणातील गुरु होते. बापू व तत्कालीन आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय सुरुवात झाली. ते मी माझे भाग्य समजतो.

 

जत तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेणे व जत तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणे हा जनकल्याण संवाद पदयात्रेचा प्रमुख उद्देश आहे. महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी व युवकांसाठी भाजप सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना राबवल्या परंतु त्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी होताना दिसत नाही योजनेपासून अनेकजण वंचित आहेत. त्याचा आढावा पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत.जत तालुक्यातील महिला भगिनी व युवकांच्या हाताला काम देणे हा प्रमुख ध्येय आहे. भविष्यात डफळापुर भागात दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचे आपले स्वप्न आहे.

 

 जतचे माजी नगरसेवक टीमूभाई एडके म्हणाले की, डफळापुरचे भूमिपुत्र व माजी सभापती स्वर्गीय सुनीलबापू चव्हाण यांचे जत तालुक्यातील राजकारणावर नेहमीच वर्चस्व होते. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत डफळापूर पॅटर्न जोरात होता. बापू सांगेल तो आमदार अशी परिस्थिती होती. आता त्यांचे सुपुत्र दिग्विजय चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी डफळापुर पॅटर्नची सूत्रे हाती घेऊन तालुक्यात एक सक्षम आमदार द्यावा.

 

पहिल्या दिवशी खलाटी, मिरवाड, जिरग्याळ अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रा समितीचे अध्यक्ष व शिवसेना संपर्कप्रमुख निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनिल पोतदार, भाजप नेते रामचंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष काम्मण्णा बंडगर, विजय पाटील, जिरग्याळचे सरपंच तानाजी पाटील, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, पिरू कोळी, नरेंद्र कोळी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here