अनेक कल्याणकारी योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी सरकार आणणार ‘हि’योजना | कसा मिळणार लाभ वाचा सविस्तर

0
9

बहुचर्चित लाडकी बहिण योजनेच्या तूफान प्रतिसादानंतर महाराष्ट्र सरकार आता लाडका शेतकरी योजना आणणार आहे.लाडकी बहिण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही महिन्याला पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथील सभेत घोषणा केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,सध्या विविध कल्याणकारी योजना आणल्या जात आहेत. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, लाडका भाऊ योजना यांसारख्या योजना आणल्या आहेत.आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला थेट मार्केट देण्याचं काम आहे. आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे. म्हणून मी आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आली. या योजनांची आम्ही घोषणा केली, त्या योजना सुरूही केल्या. आता आम्ही ‘आमचा लाडका शेतकरी योजना’ सुरू करणार आहोत.

 

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाहीत. आम्ही बांधावर जातो, असा टोलाही सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येत असतं. जेव्हा नुकसान होतं तेव्हा आम्ही मदत करताना नियम बाजूला ठेवतो. आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचं काम सुरू केलं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

दरम्यान शेतकऱ्यांना येत असलेल्या या योजनेमुळे दिलासा मिळत असून यांच्या नियम अटी अचून निश्चित नसल्याने कसा लाभ मिळणार आहे.याबाबत लवकरच अध्यादेश काढला जाणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठी मदत होणार आहे.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here