सांगली : सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 18 हजार कि.मी. पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. या विभागामार्फत राज्यातील प्रमुख राज्य महामार्ग (MSH), राज्य महामार्ग (SH) व प्रमुख जिल्हा रस्ते (MDR) या तीन प्रकारच्या रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात, त्यामुळे विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करून नागरिकांमध्ये विभागाची प्रतिमा उंचाविण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (PCRS) विकसित करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
PCRS हे अँड्रॉइड अॅप सर्व नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल. PCRS ॲप http://mahapwd.gov.in/PMIS/PWPCRS_CITIZEN.apk या लिंकचा वापर करून PWD वेबसाईटवरून आणि https://apps.mgov.gov.in/details?appid=1847 या डाउनलोड लिंकसह भारत सरकारच्या mSEVA अॅप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच Google Play store वर https://play.google.com/store/apps/details?id=com.cdac.pwd.citizen&hl=en-IN या लिंकसह कोणत्याही अंड्रॉईड मोबाईल मध्ये स्थापित करता येईल.
PCRS अँड्रॉइड अॅपद्वारे खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया – (1) नागरिकांनी त्यांच्या Android फोनवर PCRS अॅप स्थापित (Install) करावे. एकदा अॅप स्थापित झाल्यानंतर PCRS अॅप करिता आवश्यक GPS आणि Storage करिता परवानग्या देण्यात यावेत. (2) या अॅपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला एसएमएसद्वारे वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. लॉग इन करण्यासाठी कृपया हा OTP प्रविष्ट करा. (3) खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी Register Feedback बटणावर क्लिक करा आणि आपला मोबाईल GPS च्या सहाय्याने आपले वर्तमान स्थान दर्शवेल, त्यानंतर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा,
PCRS अॅप आपला मोबाइल कॅमेरा उघडेल, त्यानंतर खड्ड्याचे छायाचित्र काढ़ा व आपली तक्रार मोबाइल मार्फत टिप्पणीसह सबमिट करा. (4) तक्रार नोंदवल्यानंतर PCRS अॅप सदर रस्त्याचे नाव, तालुका, साखळी क्रमांक इ. माहिती वरुन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षेत्रीय अधिकारी ओळखेल, जर खड्डेबाबत तक्रार प्राप्त झालेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असल्यास सिस्टमद्वारे तक्रार क्रमांक तयार होईल व तसे नागरिक आणि संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना एसएमएस द्वारे कळविले जाईल. (5) क्षेत्रीय कार्यालय कनिष्ठ अभियंता हे खड्डे दुरुस्त करतील आणि 72 तासांच्या आत अँड्रॉइड अॅपद्वारे उत्तर देईल. त्यानंतर क्षेत्रीय उपअभियंता कनिष्ठ अभियंत्याच्या उत्तराची पडताळणी करतील आणि शेवटी 1 दिवसाच्या आत नागरिकास अनुपालन सादर करतील व नागरिकास एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. नागरीक वेळोवेळी PCRS अॅपवरुन त्यांच्या तक्राराची स्थिती पाहू शकतात. (6) 7 दिवसांपर्यंतच्या विलंबावर उपअभियंता स्तरावर देखरेख ठेवली जाईल, 7 ते 15 दिवसांच्या विलंबाची प्रकरणं संबंधित कार्यकारी अभियंत्याद्वारे पुनरविलोकन केले जाईल, 15 ते 30 दिवसांच्या विलंबाचे निरीक्षण संबंधित अधीक्षक अभियंता द्वारे केले जाईल व 30 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंताद्वारे पुनर्विलोकन आणि निरीक्षण केले जाईल.
00000