प्रेम म्हणजे त्याग, असं का म्हणाली समांथा?
ऊथ स्टार नागा चैतन्यने ८ ऑगस्टला बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
‘अनेकांना असं वाटतं की, मैत्री आणि रिलेशनशिप हे एकमेकांवर अवलंबून असतं आणि याच्याशी मी सहमत आहे. पण, गेल्या काही वर्षांत मला हे जाणवलं आहे की, कधी कधी प्रेमात समोरच्या व्यक्तींकडून काहीही देण्याची तयारी नसताना आपण बरंच काही देतो. हे तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत समोरचा व्यक्ती ते परत देण्याच्या स्थितीत येत नाही. प्रेम म्हणजे त्याग आहे. मी त्या सगळ्या लोकांची आभारी आहे, जे माझ्याकडे काही देण्यासाठी नसतानाही मला कायम देत राहिले.’