कवठेमहांकाळ : राज्याच्या विविध जिल्ह्यांतून चोरीस गेलेले ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २७ मोबाइल फोन कवठेमहांकाळ पोलिसांनी शोधले. हे फोन मूळ मालकांना परत करण्यात आले.
तालुक्यात प्रवास, बाजारपेठ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाइल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तांत्रिक माहिती प्राप्त करून जिल्ह्यातून चोरीस गेलेले ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २७ मोबाइल शोधून काढले. हे मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, विनायक मासाळे, वैभव पाटील, संजय कांबळे, श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती करांडे, श्रीशैल व्हनमराठे, अभिजित कासार यांच्यासह पथकाने केली. अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.