डफळापूर, संकेत टाइम्स : कोरोनाचा प्रभाव किती प्रमाणात आहे,या अनुषंगाने डफळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने सुपर स्प्रेडर अँटीजन टेस्टींग पथक नेमण्यात आले आहे.पथकाकडून शनिवारी डफळापूर मुख्य बाजार पेठेतील तब्बल 144 व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट घेतल्या.यात फक्त 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
विशेष म्हणजे डफळापूर पोस्ट कार्यालयातील एक पोस्टमेन कोरोना बाधित असल्याचे तपासणीत निष्पण झाले असून त्यांची वेळीच तपासणी केल्याने कोरोनाचा मोठा संसर्ग होण्यापासून रोकण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
या सुपर स्प्रेडर टेस्टींगसाठी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, युवा नेते भारत गायकवाड,उपसंरपच प्रताप चव्हाण, ग्रा.प.सदस्य राहुल पाटील,परशुराम चव्हाण सर,ग्रामपंचायतीचे लिपिक सतिश चव्हाण यांनी व्यापारी नागरिकांना प्रोत्साहित केले.
डफळापूर गाव गत पंधवरड्यात कोरोना हॉस्टस्पॉट झाले होते.मोठ्या संख्येने दररोज नवे रुग्ण आढळून येत होते.त्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोरोनाची गावातील वार्ड निहाय तपासणी केली होती.त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत असून कोरोना संसर्ग शनिवारच्या सुपर स्प्रेडर तपासणीत आढळून आले आहे.
स्टँड परिसर,मुख्य बाजारपेठ,पार कट्टा परिसरातील 144 व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यात एकही व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.
दरम्यान आज रविवारीही पुन्हा अशा तपासण्या घेण्यात येणार असून व्यापारी नागरिकांनी आमच्या पथकाला सहकार्य करून टेस्ट करून घ्याव्यात,गावातील कोरोना चेन तोडण्यातील हाही एक उपक्रम असल्याचे डॉ.अभिजीत चोथे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस.आर.कोळी,ए.एस.वाघमोडे,बी.एस.
डफळापूरमध्ये सुपर स्प्रेडर टेस्टिंग घेण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, भारत गायकवाड,उपसंरपच प्रताप चव्हाण उपस्थित होते.









