बिळूर (ता.जत) येथे नुकतीच तालुका कॉग्रेसची आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुखउपस्थितीत जिल्हा परिषद गटाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या प्रसंगी विकासकामांची यादी ग्रामस्थांना सादर करण्यात आली. मागील ३० ते ३५ वर्षांत गावात जो विकास घडला नव्हता, तो या ५ वर्षांच्या कालावधीत करण्यात आला. येत्या काही दिवसांत ११०० किमी लांबीचे रस्ते बांधकामाच्या योजनेत समाविष्ट असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
हे सर्व रस्ते जत शहराला जोडणारे असल्याने दळण वळण सुलभ होणार आहे. याशिवाय, उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली .