पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात १६ ऑगस्ट रोजी शेतात अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. पोलिसांनी पंधरा दिवसांत हत्येचा शोध लावला असून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. यामध्ये पत्नी मीरा मस्के व तिचा प्रियकर लव डांबरे (ढोकसळ, ता. बदनापूर) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांना पोलिसांची पाच विशेष पथके आणि पोलिस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीने हत्येचा तपास करीत होते. मृताची ओळख पटविण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन (मध्य प्रदेश) मधून आले होते. गत आठवड्यात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता.नेवासा, श्रीरामपूर रोडवरील सलग
सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. ही गाडी अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाईनगर, ता. जि. जालना) यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. त्यांची पत्नी मीना ही लोणी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुरुवारी त्या महिलेचा शोध घेत पोलिस पथक लोणी येथे पोहोचले. त्यावेळी मीना अंबादास म्हस्के (३६) हिच्यासह प्रियकर लहू शिवाजी डमरे (३१) यांना ताब्यात घेतले.
लहू डमरे याने पोलिसांना सांगितले की, त्याचे मीना म्हस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून, तिचा पती अंबादास हा तिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता. त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचे आहे, असे सांगून एका गाडीत बसवले होते.